Image

पगार तारण कर्ज

आपल्या तात्काळ गरजा भागवणं असो किंवा आपली छोटी-मोठी स्वप्नं असोत, पैसा हाताशी हवाच असतो. परंतु सर्वसामान्य नोकरदार बंधूंना आपल्याच कामाच्या पैशांसाठी अर्थात पगारासाठी महिनाभर वाट पाहावी लागते. गरजेच्या वेळी हाताशी पैसे नसल्यास मोठी तारांबळ होते. अशा वेळी तुम्हाला साथ देते उर्जा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत, पुणे !

आम्ही जाणतो तुमच्या स्वप्नांचं आणि गरजांचं महत्व आणि म्हणूनच संस्था तुम्हाला उपलब्ध करून देते पगार तारण कर्ज; ज्यात तुमच्या येणाऱ्या पगारावर तुम्हाला कमीत कमी कागदपत्रांवर तात्काळ कर्ज मिळवून दिले जाते व वेळीच तुमची गरज पूर्ण करण्यासाठी हातभार लावला जातो.

तुम्ही नोकरदार असाल तर गरजेच्या वेळी पगाराची वाट पाहू नका. पगार तारण कर्जासाठी व त्याबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.

विविध बँकिंग सेवा विनंतीसाठी संपर्क करा

आता आपल्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी वाट पाहू नका, तुमच्या जीवनाचा प्रत्येक आनंद अनलॉक करा, तुमच्या आयुष्यातील विविध टप्प्यांवर तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उर्जा नागरी सहकारी पतसंस्था कटिबद्ध आहे.

उर्जा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व श्रेणींच्या विस्तृत माहिती व सेवा विनंतीसाठी आमच्याशी संपर्क साधा. उर्जा नागरी सहकारी पतसंस्थेचे तज्ज्ञ सहाय्यक 24/7 आपल्या सेवेत सज्ज आहेत; जेणेकरून आमच्या समस्त ग्राहकांना एका अतुलनीय डिजिटल बँकिंग सेवेचा अनुभव घेता येईल.

तुमच्या इच्छा व स्वप्न तीन सोप्या टप्प्यात पूर्ण करा -

  1. आमच्या संपर्क फॉर्मवर जा आणि अर्ज करा.
  2. आवश्यक तपशील भरून फॉर्म सबमिट करा.
  3. आमचे ग्राहक सेवा कार्यकारी तात्काळ तुमच्याशी संपर्क साधतील.

संपर्क साधा

Copyright ©2023 | उर्जा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत, पुणे| All Rights Reserved.